Thursday, 2 June 2011

STORY--GARVACHE GHAR KHALI

          एकदा भीमाला आपल्या शक्तीचा भलताच गर्व झाला. त्याला असे वाटायला लागले कि या पृथ्वीतलावर माझ्यासारखे शक्तिवान कोणी नाही. मलाच सर्व शक्ती दिलेली आहे. मी एका क्षणार्धात मुळापासून झाडे उपटू शकतो असे त्याला वाटायला लागले.
          एकदा भीम आपल्याच नादात जंगलातून जात होता. जाता जाता त्याला रस्त्यावर वानर दिसले. वानराने आपली शेपटी रस्त्यामध्ये ठेवून रस्ता अडवला होता. भीमाला ते दिसले. भीम मनातून चिडला व वानराला म्हणाला,"ए वानरा,तू मला ओळखलेले दिसत नाहीस?" वानराने त्याच्याकडे बघितले व म्हणाले,"कोण तू?" भीम आणखी चिडला. या जगातील सर्वात शक्तिवान भीम. तुझी हि क्षुद्रासारखी शेपटी बाजूला काढ. मला पुढे जाऊ दे. वानर म्हणाले,"अरे बाबा,मी आता थकलोय. माझ्या अंगात शेपटी उचलण्याएवढेही त्राण नाहीत. तूच मला माझी शेपटी बाजूला काढायला मदत कर." त्यावर भीम हसला व म्हणाला,"त्यात काय एवढे? मी मुळापासून झाडे उपटतो. तुझी शेपटी ती केवढीशी. एका क्षणात बाजूला काढतो बघ."
          भीमाने एका हाताने वानराची शेपटी उचलायचा प्रयत्न केला. शेपटी उचललीच जाईना. भीमाने शेपटीला दुसरा हात लावला. तरी शेपटी जगाची हलेना. भीमाने आपली सर्व शक्ती पणाला लावली. तरीही शेपटी जागची हलली नाही. शेवटी भीम थकला व वानराला शरण गेला.
          भीम वानराला म्हणाला,"आजपर्यंत मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता. या पृथ्वीतलावर मीच शक्तिवान आहे. असा माझा समज झाला होता. तो समज नाहीसा झाला. मी तुला शरण आलो आहे. आता तरी तू तुझी शेपटी बाजूला घे. वानराने आपली शेपटी बाजूला घेतली व आपली शेपटी बाजूला घेतली व आपले खरे रूप प्रकट केले. वानराचे मारुतीत रुपांतर झालेले बघून भीम आश्चर्यचकित झाला व त्याने मारुतीला लोटांगण घातले.

                                                                    "आनंद" या लहान मुलांच्या पुस्तकातून

Monday, 30 May 2011

poam-light achanak geli

       एके दिवशी काय झाले ?
लाईट अचानक गेली ||
बाहेर मुसळधार पाऊस पडताना |
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट,
मुले पार गोंधळून गेली ||१||
सर्वजण एकत्र जमून,
गप्पा टप्पात रमली |
कुणी सांगू लागल्या आठवणी ,
कुणी म्हणू सगळी गाणी,
कुणी काढला भुताचा विषय,
मुले पार घाबरून गेली ||२||
बाहेर मुसळधार पाऊस पडताना,
ढगांचा गडगडाट,विजांचा कडकडाट,
लहान मुले आईच्या कुशीत शिरली ||३||
कुणाचा राहिला अभ्यास,
कुणाला पाहायचा होता टि.व्ही.,
आत्ता येईल,मग येईल 
मुले वाट पाहू लागली ||५||
वाट बघता, वाट बघता लाईट
अचानक आली,मुले आनंदाने
टाळ्या पिटू लागली ||६||

"आनंद" या लहान मुलांच्या पुस्तकातून